पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील एका मुलाला काहीही कारण नसतांना लाकडी दांड्याने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ डिसेंबर रोजी दोन जणांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अभय निलेश सुर्यवंशी (वय-१७) रा. होळी मैदान, शेंदुर्णी ता. जामनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शेंदुर्णी गावातील राजपूत हॉस्पिटलच्या मागे असलेल्या सुर्यवंशी फोटा स्टुडीओ येथे काहीही कारण नसतांना संदीप सुकलाल गुजर आणि रविंद्र सुकलाल गुजर दोन्ही रा. शेंदुर्णी ता. जामनेर यांनी शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर एकाने लाकडी दांडका हातात घेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर अभय सुर्यवंशी याने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी संदीप सुकलाल गुजर आणि रविंद्र सुकलाल गुजर दोन्ही रा. शेंदुर्णी ता. जामनेर यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.