अमळनेरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जोशीपुरा भाग परिसरातून एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील जोशीपुरा या परिसरात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या दरम्यान गावातील विजय बारकू भिल याने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे. असा संशय मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात मुलीच्या आईने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विजय बारकू भिल याच्या विरोधात मंगळवारी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.

Protected Content