शेंदुर्णी प्रतिनिधी । सध्या राज्यात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असून शेंदुर्णी शहरातील धोकादायक असणाऱ्या इमारती चक्रीवादळ व पावसामुळे पडून जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी स्वत:सह कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे.
1. वादळामुळे व पावसामुळे धोका संभवणाऱ्या इमारती सोडून इतर सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरात जाऊ नका. 2. वादळामुळे व पावसामुळे धोका संभवणाऱ्या पाळीव प्राण्यांची सुरक्षित स्थळी व्यवस्था करावी. 3. अत्यावशक असेल तरच घराबाहेर पडावे. 4. अनावश्यक प्रवास टाळावा. 5. मोठी झाडे वादळामुळे पडण्याची शक्यता असल्याने अशा झाडाखाली निवारा घेणे टाळावे. 6. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर अथवा इतरत्र पडलेल्या वीज तारांचा स्पर्श टाळावा. 8. दारं खिडक्या बंद ठेवाव्यात. 9. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत रहा. 10. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. 11. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी पाळा. गोष्टींचे पालन करून नगरपरिषद प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे व सुरक्षित रहावे असे आवाहन नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.