जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून कोवीड रूग्णांची दिलासादायक आकडेवारी आज सायंकाळी प्राप्त झाली आहे. आज आलेल्या अहवालात १७ मे नंतर पहिल्यांदा एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. तर आज जिल्ह्यात एकुण ९१ रूग्ण आढळून आले. तर २३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर -१२, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-१६, अमळनेर-९, चोपडा-५, पाचोरा-२, भडगाव-४, धरणगाव-५, यावल-२, एरंडोल-०, जामनेर-८, रावेर-३, पारोळा-१, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर-३, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा २ असे एकुण ९१ रूग्ण आज आढळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९२.८३ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ५१ हजार ३०४ रूग्ण आढळून आले असून ४७ हजार ६२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकही रूग्णांचा मृत्यू झालेला नाही. एकुण जिल्ह्यात १२३० रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता २ हजार ४४८रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.