यावल( प्रतिनिधी) प्रत्येक वाहनधारकांनी आपले सामाजीक कर्तव्य म्हणुन शिस्त व वाहन नियमांचे पालन केल्यास अनेक होणारे अपघात टाळता येतील व या अपघातातुन मिळणारे अपंगत्व तसेच निष्पाप नागरीकांचे जिव आपण वाचवु शकाल शिस्तीचे पालन न करणाऱ्या वाहनधारकाची आपण गय करणार नाही अशी माहीती मोटर वाहन निरीक्षक डींगबर काटे यांनी प्रस्तुत प्रतिनिधिंशी बोलतांना दिली ते आपल्या नियमीत होणाऱ्या वाहन तपासणी मोहीम कार्या संदर्भात यावल येथे आले असता उपरोक्त माहीती त्यांनी दिली .
यावल येथे आज दिनांक २ एप्रील रोजी सकाळी१० वाजता मोटर वाहन निारीक्षक डिंगबर काटे व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल मोरे यांच्या मोटर वाहन तपासणी पथकाने यावल व परिसरातील २३ वाहनावर दंडात्मक कार्यवाही करून १ लाख ३६ हजार२०० रुपये दंड वसुल केले यात वाहन योग्यतापत्र समाप्त झालेली ९ वाहने,ईन्शुरन्स संपलेली ९ वाहने, फिटनेस योग्यता प्रमाण पत्र नसतांनाही अनधीकृत डी जे .व इतर वाद्याची बांधणी केली म्हणुन एका डी जे वाल्या कडुन सुमारे २६ हजाराच्या वर दंडवसुल करण्यात आले, या शिवाय विविध नियमांचे पालन न करणाऱ्या ट्रॅक्टर व आदी बेशिस्त वाहनांकडुन सुमारे ८० हजार रुपयाची दंडासह एकुण १ लाख ३६ हजार२०० रुपयांची वसुली,करण्यात आली आहे.