शिवाजी महाराजांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण ; एकाच्या तोंडाला काळे फासून काढली धिंड

 

चंद्रपूर (वृत्तसंस्था) गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या एका व्यक्तीच्या तोंडाला फासत शिवप्रेमींनी त्याची धिंड काढली. फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विकृताचे नावं जितेंद्र राऊत असे आहे.

जितेंद्र राऊत हा अनेक दिवसापासून फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खालच्या भाषेत एकेरी शब्दप्रयोग करत होता. पोस्टवर येणाऱ्या प्रतिक्रियेवरही राऊत हा चिथावणीखोर उत्तरं देत होता. शिवप्रेमींना अनेकदा जितेंद्र राऊतांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र राऊत याने लिखाण करणे सोडले नाही. अखेर आज शिवप्रेमींना जितेंद्र राऊताला पकडून चांगलाच चोप दिला. इतकेच नाही तर राऊत याच्या तोंडाला काळे फासून त्याची धिंड काढण्यात आली.

Protected Content