जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शिवाजी नगर हुडको परिसरात मध्यरात्री घरात शॉर्टसर्कीटमुळे फ्रिजला आग लागल्याची घटना घडली असून यात १० हजाराचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी १६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद शोएब मोहम्मद इसाक (वय-३७, रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव रेल्वेस्टेशन येथे चहा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी १५ जानेवारी रोजी ते घरीच होते. त्यानंतर रात्री जेवण करून सर्वजण झोपले. सोमवारी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घरातील ईलेक्ट्रीक शॉर्टसर्किटमुळे फ्रिजला आग लागून नुकसान झाले. या घटनेची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला विभागाला देण्यात आले. अग्निशमन पथक घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विझवण्यात आली. यामध्ये १० हजार रुपये किमतीचा फ्रिज जळून खाक झाला आहे. घरमालक मोहम्मद शोएब मोहम्मद इसाक यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. सोमवारी १६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता दिलेल्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.