जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवाजीनगर परीसातील मकरा शिरीन अपार्टमेंट, बोहरा मस्जिद तसेच,शिवाजीनगर हुडको,याभागात पावसाचे पाणी न पडताच गटारी,नाले तुंबून वाहू लागले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांची तत्काळ स्वच्छता करण्याची मागणी अल्पसंख्यांक सेवा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
शिवाजीनगर परिसारत गटारींची महापालीकडून नियमित स्वच्छता करण्यात येत नाही. यामुळे पावसाळ्याच्या ऐन तोंडावर या परिसरातील गटारीत घाण व कचरा साचला आहे. पावसाचे पाणी न पडताच ह्या गटारी तुंबून वाहू लागल्या आहेत. हे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापौर तक्रार निवारण कक्षात फोन लावला असता तो लागत नसल्याची व्यथा येथील नागरिक मांडत आहे. या समस्येकडे स्थानिक नगरसेवकांनी लक्ष द्यावे अशी मागणी अल्पसंख्यांक सेवा संघटनेतर्फे करण्यात आली आहे. पावसाळा सुरु झाला असून शिवाजीनगर परिसरातील तुंबलेल्या गटारींची तत्काळ स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी अल्पसंख्यांक सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जहाँगीर ऐ खान,जिल्हा उपाध्यक्ष अकबर काकर, रॅमिज शेख,इस्माईल शहा,आदींनी केली आहे.