मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनात पुन्हा एकदा फूट पडणार असल्याचे भाकीत केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, उध्दव ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देश आहे. ठाकरे यांचं राजकारण फक्त आणि फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांचा गट संपला आहे. शिवसेना कुठे राहिली आहे? ५६ वरून सहा ते सात आमदार उरले आहेत. तेही वाटेवर आहेत. ते लवकरच सहभागी होतील, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
काही लोक टिंगल टवाळी करत आहेत. मिमिक्री करत आहेत. यांचा कसला बालेकिल्ला? जे बोलत आहेत. त्यांचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरलेला नाही. ज्या पक्षातील हे लोक आहेत. त्या पक्षाच्या लोकांनी तपासलं पाहिजे. तुम्हाला भास्करची भाषा आवडते का? माझीच मुलं कशी दिसतात? असा सवालही त्यांनी केला.