जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार या मोहिमेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली आहे. यानुसार मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शहरात काही नागरिक मास्क वापरत नसल्याने त्यांना शिवसेना महानगर व महिला आघाडीतर्फ मास्कचे वाटप करण्यात आले.
शिवसेना महानगर व शिवसेना महिला आघाडीतर्फे फुले मार्केट परिसर व टाॅवर चौकात विना मास्क व ज्यांनी मास्क ऐवजी रुमाल बांधला होता त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, विराज कावडिया, वसिम खान, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मंगला बारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1087889635374731