मंगल कार्यालय, फोटोग्राफर , आचाऱ्यालाही तपासावे लागणार नवरीचे वय

 

 नांदेड : वृत्तसंस्था । नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी मंगल कार्यालये, फोटोग्राफर आणि केटरर्सना  पत्र पाठवले आहे. त्यानुसार  नवरीचे वय १८ वर्ष तर नवरदेवाचे वय २१ वर्ष पूर्ण असल्याची खात्री त्यांना करून घ्यावी लागणार आहे. अन्यथा  दंड आणि शिक्षेची तरतूद कायद्यात असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

 

बालविवाह रोखण्यासाठी केंद्र आणि  राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न केले  जातात.  बालविवाह प्रतिबंध  कायद्यातही अनेकदा बदल करण्यात आले आहेत.

भारतात मोठ्या प्रमाणात बाल विवाह  करण्याची परंपरा होती.  आजही अनेक  ठिकाणी बाल विवाह होताना दिसून येतात. आजही १०० टक्के बालविवाह थांबलेले नाही.

Protected Content