शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबीर (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोलाणी मार्केटमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गोलाणी मार्केटमधील आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पूनम राजपूत, सिंधी मार्केट असोशिएशनचे दिपक तलरेजा, जसपाल कासवानी, विजय बांदल, महेश चावला, कृपाल गिरधार दामि, राहुल भाऊ, पिंटू कुलकर्णी, जितू मंधान, सागर कुकरेजा, मनोज खान चंदानी, मोहित माधवानी आदी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्या सहकार्याने गोलाणी मार्केट सुरु करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. पालकमंत्री ना. पाटील यांनी व्यवसाय करतांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे तसेच सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसारच व्यवसाय करत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. सकाळपासुन जवळपास २०० व्यापाऱ्यांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. या स्क्रिनींगमुळे ग्राहक जेव्हा गोलाणी मार्केटमध्ये दाखल होईल तेव्हा त्याला आपण सुरक्षित असल्याची खात्री यातून मिळणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1127232120986674/

 

Protected Content