शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन (व्हिडिओ)

चाळीसगाव, जीवन चव्हाण ।  शिवसेनेचे नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगावातील पुरग्रस्तांसाठी आरोग्य शिबीर अंतर्गत मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

 

चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे  जनजिवन विस्कळीत झाले आहे. नैसर्गिक आणि मानवी मालमत्तेची अपरिमित हानी झाली असून शासन, दानशुर व्यक्ती व सामाजिक संस्था यांच्या मार्फत पुनर्वसन कार्य सुरू झाले आहे. यानुसार चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट मुंबई, ठाणे येथून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  चार रुग्णवाहिकांसह पथक चाळीसगावात दाखल झाले आहे.  या चार रुग्णवाहिकांमध्ये किमान दहा ते पंधरा हजार लोकांना औषधोपचार करता येईल एवढी मदत औषधी मुंबई, ठाणे येथून प्राप्त झाली आहे. ही मदत गरजूंना पोहचविण्यासाठी चार पथक तयार करण्यात आली आहेत. एका पथकात दोन डॉक्टर, दोन केमिस्ट व चार स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे. 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/892664321623805

 

Protected Content