धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून अद्ययावत स्वर्ग रथाचे ( वैकुंठ रथ ) लोकार्पण आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस डी.जी. पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीतील मान्यवर उपस्थित होते.
धरणगाव शिवसेनेच्या वतीने नेहमीच गरजू रुग्णांना आवश्यक असलेल्या वस्तू व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत असतात. आजवर हजारो लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या रुग्णसेवेचा आणखी विस्तार करण्याच्या उद्देशाने शिवसेनेने आज पुढील महत्वाचे पाऊल उचलले आहे. मरणोत्तर सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निधीतून अद्ययावत स्वरूपाचा स्वर्ग रथ तयार करण्यात आला आहे. या स्वर्ग रथाच्या वाहनाची किंमत ८ लाख रुपये असून त्यावर साधारण सव्वा लाखाचा इतर खर्च करण्यात आला आहे. आज शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नगरपालिकेत महाविकास आघाडीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नगरसेविका अंजलीताई विसावे, विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश भागवत, नगरसेवक अहमद पठाण, राजेंद्र ठाकरे, प्रांतधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.