फैजपूर येथे स्व. हरीभाऊ जावळे यांना सर्वपक्षीयतर्फे श्रध्दांजली

फैजपूर प्रतिनिधी । माजी खासदार स्व. हरीभाऊ जावळे यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळेदे, नगरसेवक केतन किरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अनवर खाटीक, शिवसेना शहरप्रमुख अमोल निबांळे यांनी हरीभाऊंच्या सार्वजनिक सामाजिक राजकीय जीवनात केलेल्या कामाबद्दल आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, नगरसेवक हेमराज चौधरी, राष्ट्रवादी गटनेता शेख कुर्बान, उपनगराध्यक्ष रशिद तडवी, नगरसेवक केतन किरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटीक, शिवसेना शहर प्रमुख अमोल निबांळे, भाजपा शहराध्यक्ष अनंत नेहते, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख रियाज, माजी नगरसेवक आप्पासाहेब चौधरी, समाजसेवक रविंद्र होले, राष्ट्रवादीचे शेख शाकिर, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, माजी नगरसेवक मनोज कापडे, माजी नगराध्यक्ष पी.के. चौधरी, संजय सराफ, कुसूम चौधरी विद्यालयाचे सचिव पंडित कोल्हे, विजय मिस्त्री, सोएब बेग आदी पदाधिकारी व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content