जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत त्यास तुरुंगात टाका यामागणीसाठी शिवसेनेच्यात वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोडे मारो आंदोलन करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो व बांगडी भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्याने मोहीम सुरू केली. केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शवल्यानं किरीट सोमय्या पुढे आला आणि प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर विमानतळावर डबे घेऊन उभा राहिला. आयएनएस विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सढळ हस्ते दान केलं. नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले. या रकमेचं किरीट सोमय्याने काय केलं ? ते देशाला समजायला हवं, ही रक्कम तो भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होता, मात्र सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने गद्दारी केलं आहे. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. किरीट सोमय्याने आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचं काय झालं? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली. राजभवनानं आपल्याला किरीट सोमय्याकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचं माहिती अधिकाराखाली मागविलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे. किरीट सोमय्याने गोळा केलेला पैसा राजभवनात जमा झाला नाही, मग तो कोणाच्या खिशात गेला? हा पैसा कोणी खाल्ला ? ह्याची उत्तरे राज्यातील जनतेला मिळायलाच हवीत. या घोटाळ्यात किरीट सोमय्यांने अंदाजे १०० कोटींचा घोटाळा करून हे पैसे त्याच्या बांधकाम व्यवसायाकरिता तसेच निवडणूक खर्चाकरिता वापरल्याचा अंदाज कात केला जात आहे. अशा देशद्रोही कृतीमुळे किरीट सोमैय्याला राज्यात काय देशातही राहण्याचा खरेतर अधिकार किरीट सोमय्या तसेच भाजपकडून मागत आहे. तरी यासंदर्भात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्ष शोभा चौधरी, नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन सपके, प्रशांत सुरळकर, शिवराज पाटील, महानंदा पाटील, मनीषा पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/496120821968208