जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्रात शिवसेनेने सत्तेसाठी विरोधकांशी हातमिळवणी करून तत्वांशी तडजोड केली, असल्याची टीका जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष कविंदर गुप्ता यांनी येथे व्यक्त केले.
गुप्ता हे रविवारी दुपारी खासगी दौर्यानिमित्ताने जळगावी आले होते. याप्रसंगी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, जम्मू-काश्मिरात आता पर्यटन विकास होत आहे. केंद्र सरकारने आपल्या कार्यकाळात आतापर्यंत तीन तलाक, राममंदिर व ३७० कलम अशा महत्त्वाच्या व ७० वर्षात होऊ न शकणार्या विषयांना हात घालून पास केल्याने कुठे तरी विरोध करावा म्हणून सीएए, एआरसी व एनपीआर कायद्याला विरोध सुरू आहेे. शाहीन बाग आंदोलन दिल्ली विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेले आंदोलन होते. ताहीर हुसेनच्या घरातून काय-काय मिळत आहे?, ते भारतीय पाहत आहे. काँग्रेसचे डमी उमेदवार व फुकटच्या मिळणार्या गोष्टींमुळेच दिल्लीत विरोधक जिंकल्याचे कवियदी गुप्ता यांनी उपमहापौर आश्विन सोनवणे यांच्या निवासस्थानी बोलताना सांगितले.