मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मालेगाव काढ्याचे वाटप (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । येथील शिवाजीनगर शिवसेना विभाग व हजरत बिला बहुद्देशीय संस्था यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगाव काढ्याचे वाटप करण्यात आले.

शिवाजीनगर शिवसेना विभाग व हजरत बिला बहुद्देशीय संस्था यांच्यामार्फत कोरोना सारख्या भयानक आजारावर मात देण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी मालेगाव काढ्याचे वाटप करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अखिल शेख पैलवान, माजी नगरसेवक अंकुश कोळी, शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल, इमाबेक शेख समीर खाटिक, श्रीरंग बापू पोळ, सिताराम पुरोहि,त गोपाल व्यास, नितीन पाटील, मोहन उर्फ शेरा जाधव, कैलास गायकवाड, गजानन मांढरे, दत्तात्रय बांदल, महिंद्र महागडे, विशाल महागडे, ओम महागडे व वॉर्डातल्या महिला उपस्थित होत्या.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/322567442207976/

Protected Content