जळगाव, प्रतिनिधी | येथील शिवसेना महानगरतर्फे पिंप्राळा हुडको येथे रविवारी राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा अंदाजे ३०० महिलांनी लाभ घेतला.
शिवसेनेचे अल्पसंख्यांक महानगर प्रमुख जाकिर पठाण यांच्यातर्फे पिंप्राळा हुडको येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातील जवळपास ३०० महिलांनी आरोग्य तपासणी करीत लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा गटनेते अनंत जोशी, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी कोल्हे, नीलू इंगळे यांची उपस्थिती होती. महिलांची आरोग्य तपासणी माई हॉस्पिटलच्या डॉ.कांचन पाटील, इरफाना खान, डॉ.राजश्री मॅडम, डॉ.सोनली मॅडम, डॉ.जितेंद्र कोळी, परिचारिका मीनाक्षी, मनीषा यांनी केली. शिबिरासाठी अल्पसंख्यांक उप महानगर प्रमुख इकबाल शेख, वसिम खान, शोइब खाटीक, फरीद खान, शारुख शेख, विकी खान, शोईब खान, इम्रान खान, सोहील खान आदींनी परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/929093251345610