शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे

 

मुंबई, वृत्तसंस्था । शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आज, मंगळवारी सकाळी मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे मारले.

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत. ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात आज सकाळीच ईडीने त्यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापेमारी केली. मुंबईसह ठाण्यातील एकूण १० ठिकाणांची झाडाझडती घेतली जात आहे.

Protected Content