मुंबई । दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला आज त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रारंभ करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी कालच राज्य सरकारने १०० कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. या स्मारकाच्या कामाला महापौर बंगला येथे आज सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते यावेळी गणेशपुजन झाले. याप्रसंगी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार भाजपा नेत्या पुनम महाजन, मुंबईचे महापौर महाडेश्वर, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्हे आणि ठाकरे कुटुंबिय उपस्थित होते.