शिवणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी करिश्मा पाटील बिनविरोध

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील शिवणी गावाच्या सरपंचपदी करिश्मा सोमसिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर मान्यवराच्या हस्ते करिश्मा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. करिश्मा पाटील ह्या माजी सरपंच खुमानसिंग हिलाल पाटील यांच्या सूनबाई आहेत. तसेच गावासाठी काही तरी देणे लागते या भावनेतून आज शिवणी गावाच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल गावाला पाण्याचे टँकर मान्यवरांच्या हस्ते शिवणी गावातील भेट दिले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व सदस्या प्रतिभा जयदीप पाटील , जनाबाई रमेश पाटील,रोहिदास रुपला सोनवणे,सुरेखा शिवसींग पाटील,अर्चना स्वरणसिंग पाटील, कल्पणाबाई आपा खैरे, सुमनबाई सुरेश सोनवणे,कोमल चंद्रमणी खैरे,उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चव्हाण रावसाहेब यांनी काम पाहिले,तर त्याच्या सोबत तलाठी विजय शिंदे ग्रामसेवक श्रीमती अर्चना कचवा,गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content