Home क्राईम शिवकॉलनी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

शिवकॉलनी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

0
21

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

शिवकॉलनी परिसरात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. शुक्रवार १७ डिसेंबर राेजी रात्री साडेसात वाजता मुलगी कुणाला काही एक न सांगता घरातुन निघून गेली. पुन्हा घरी परतली नाही. कोणी तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय आहे मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल नीलेश पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound