पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा काॅग्रेस मध्ये इनकमिंग सुरू झाले असून सामाजिक कार्यात सेवा देणाऱ्या शहरातील शिला सुर्यवंशी यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे.
शहरातील सामाजिक कार्यात जनसेवा देणारी महिला म्हणून स्वतः ची ओळख निर्माण करणार्या शिला हरीश सुर्यवंशी यांनी धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देणार्या कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे जिल्हा सरचिटणीस कुसुम पाटील यांनी स्वागत करून पक्षप्रवेश दिला.
यावेळी महिला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृ. बा. प्रशासक प्रा. एस. डी. पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शरीफ खाटीक, रेशनिंग कमिटी अध्यक्ष राजु महाजन, प्रकाश सोनवणे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, इस्माईल तांबोळी, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ. फिरोज शेख, शरीफ शेख, शंकर सोनवणे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, आबीद शेख, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, प्रविण पाटील, सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, आदी उपस्थित होते.