Home Cities अमळनेर शिरूड येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू

शिरूड येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू

0
36

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील शिरूड येथील घराच्या अंगणात बांधलेल्या बैलाला ता.२८रोजी सायंकाळी ७वाजेच्या सुमारास सर्पदंश झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.येन शेतीच्या कामाच्या दिवसात बैलाच्या मृत्यू मुळे हळहळ व्यक्त होत आहे.

 

शिरूड येथील रहिवासी भैय्या साहेबराव पाटील यांच्या अंगणात त्यांचा मालकीचा बैल बांधलेला होता.परंतु, सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बैल अचानक जागेवर पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता बैल त्यांना निपचित पडलेला दिसला.व त्याच्या तोंडातून फेस निघत असल्याने कोणत्यातरी विषारी जातीच्या सर्पाने त्यास दंश केला असल्याने बैल जागीच गतप्राण झाला होता. मागील काही दिवसापासून भैय्या पाटील यांच्या घराच्या अंगणात बांधलेली बैल जोडी मधील एक बैल रात्री चोरांनी सोडून नेला होता.तर त्याच जोडी मधील एका बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने ऐन शेतीच्या कामांची लगबग असतांना बैलाची जोडी गमविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound