यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील शिरागड येथे यावल तालुका आरोग्य विभागाकडून नवरात्र उत्सव निमित्ताने क्षयरोग आजार कसा बरा होतो व त्यावर काय व कसे उपचार केले पाहिजे या विषयावर शिरागड येथील श्री सप्तश्रुगी देवीच्या मंदिरात यावल तालुका क्षयरोग पर्यवेक्षक नरेद्र तायडे यांनी जनजागृती बद्दल मार्गदर्शन केले.
क्षयरोग मुक्त अभियान अंतर्गत यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे , साकळी येथील डॉ. स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शना क्षयरोग आजारावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. क्षयरोग आजार निदान पुर्ण केल्यावर बरा होतो या आजारावर आरोग्य विभाग मार्फत औषध उपचार करण्यात येत असून शासना कडुन अनुदान मिळते रुग्णानी कुठल्याही अफवेला बडी नपडता आरोग्य विभागाशी संपर्क साधून क्षयरोग आजार बद्दल मनातील शंका काढावी असे मार्गदर्शन आशा स्वंयमसेविका कल्पना सोळंके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटप्रवर्तक चित्रा जावळे, मनवेल येथील आशा स्वंयमसेविका रंजना कोळी , थोरगव्हाण येथील निर्जलाबाई सोनवणे, पुनम पाटील,माया धिवर,ज्योति मोरे आनिता पाटील आदी उपस्थित होते.