शिरसोली येथील तरूणाच्या घरासमोरून दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील शेतकऱ्याच्या घरसमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना नुकतीच घडली. दुचाकी शोधून मिळाली नाही म्हणून शुक्रवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, हेमंत गोविंदा बारी (वय-२३) रा. शिरसोली ता. जि.जळगाव हा तरूण शेतकरी आहे. शेताच्या कामासाठी त्यांच्याकडे दुचाकी (एमएच १९ डीडी ४१०२) क्रमांकाचे वाहन आहे. नेहमीप्रमाणे १७ जानेवारी रोजी रात्री आठ वाजात दुचाकी घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याचा प्रकार १८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला आहे. दुचाकी परिसरातून शोधाशोध सुरू केली असता मिळून आली नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

Protected Content