जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात जवळील हॉटेल प्रीतजवळ पायी जाणाऱ्या तरुणाला भारधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुण जखमी झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अजीम हबीब पटेल (वय 30) रा. साळवा ता. धरणगाव जि. जळगाव हा तरुण जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे गावात गुरुवार, दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता पायी जात होता. त्यावेळी त्यांच्या मागून (एमएच १९ डीएच ३७५७) क्रमांकाची दुचाकी येत असताना दुचाकीस्वाराने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत अजीम पटेल हा गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी दुचाकी धारकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.