शिक्षकाची सामाजिक बांधिलकी ; वाढदिवसाच्या दिवसी गरजुंना किरणा वाटप

पारोळा, प्रतिनिधी । तालुक्यातील भिलाली केंद्रातील अवघड क्षेत्रातील आदिवासी बांधवांची वस्ती असलेल्या जि.प. प्राथ शाळा हिवरखेडे बु. शाळेचे उपशिक्षक ईश्वर धोबी यांनी आपला वाढदिवस असल्याने खर्च न करता लॉक डाऊनमुळे गरीब व गरजू कुटुंबांना गृह उपयोगी व किराणा साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

हिवरखेडे बु.येथील जि प शाळेचे उपशिक्षक ईश्वर धोबी यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांनी हिवरखेडे गावातील सर्व गरीब व गरजू कुटुंबांना  जीवनावश्यक वस्तू  (तेल,साखर,चटणी,मीठ,साबण,बिस्किट)यांचे वाटप केले.   शासन नियमांचे सोशल डिस्टंन्सीचे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दगडू पाटील, शिवाजी जोगी, वसीम पठाण, भिलाली सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. गाम्रस्थांना गरजेच्या काळात जीवनावश्यक मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसुन येत होते.  त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे .

Protected Content