यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल येथील स्वर्णकार समाजातील सामाजीक कार्यकर्ते नितिन सोनार यांची शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नुकतीच जाहीर केलेल्या रावेर लोकसभा क्षेत्राच्या कार्यकारणीत यावल येथील नितिन सोनार यांची जळगाव जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आली आहे.
नितिन सोनार यांच्या निवडीचे आ.चंद्रकांत पाटील , जळगाव जिल्हा प्रमुख समाधान महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व खरेदी विक्री संघाचे संचालक तुषार पाटील, रावेर लोकसभाचे पक्ष निरिक्षक विजय देशमुख ,जिल्हा महिला जिल्हा संपर्क संजना पाटील यांच्यासह नितिन सोनार यांचा मित्र परिवार माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक देशपांडे, कॉन्ट्रॅक्टर अनिल पाटील, विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चेतन अढळकर व पक्षातील प्रमुखपदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.