Home आरोग्य शाहूनगरातील मनपा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; गटारी तुंबल्याने दुर्गंधी वाढली

शाहूनगरातील मनपा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; गटारी तुंबल्याने दुर्गंधी वाढली


जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालय परिसरात मनपा कर्मचारी यांचे निवासस्थान आहे, या निवासस्थानातील कर्मचारी हे रोगराईला कंटाळले आहेत. दरम्यान या परिसरातील गटारीवरील ढापे काढून टाकण्यात आल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

अनेक ठिकाणी डबकेही साचले आहेत. पाणी वाहून जात नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरली आहे. तसेच शौचालयाच्या सेफ्टी टाकी उघडी केल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात लहान मुलं विविध खेळ खेळत असतात, प्रसंगी एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. महापालिकेचे या प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ पाहत आहे. या भागात सफाई कामगारही दररोज येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तरी लवकरात लवकर पालिका प्रशासनाने अपूर्ण काम पूर्ण करावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound