नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शाहीन बाग परिसरात कुणीही एकत्र जमू नये, तसेच कुणीही आंदोलन करु नये असे दिल्ली पोलिसांनी नोटीशीद्वारे बजावले आहे. दिल्ली पोलिसांनी शाहीन बाग परिसरात कलम १४४ हे जमावबंदीचे कलम लागू केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. परंतू शाहीन बाग परिसरात जमावबंदीचा आदेश दिल्यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रविवारी हे आंदोलन संपवण्यात येईल अशी घोषणा हिंदू सेनेने केली होती. त्यानंतर पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. हा आदेश न मानल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शाहीन बाग परिसरात जमावबंदीचा आदेश दिल्यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.