शास्त्री फार्मसी कॉलेजतर्फे ‘ऑनलाइन टिचिंग व लर्निंग’

एरंडोल, प्रतिनिधी । लॉकडाऊनमूळे डी. फार्मसी व बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोलतर्फे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन टिचिंग अँड लर्निंग सुरू करण्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, लोणारे व महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

लॉक डाऊनमुळे विध्यार्थी त्यांच्या घरीच प्रत्येक विषयाच्या प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हाट्सएप, गूगल अप, युट्यूब व इतर माध्यमातून करण्यात येत आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा सुद्धा सविस्तर वेळापत्रक करून आयोजित करण्यात येत आहेत. या ऑनलाइन पद्धतीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या सर्वत्र वापरला जाणारा अप म्हणजे झुम अप न वापरण्याचे कारण म्हणजे बरेच विद्यार्थी हे अती दुर्गम भागातील आहेत त्यामुळे, एवढ्या दुर्गम भागात इंटरनेट सुविधा हवी तेवढी सक्षम नसते म्हणूनच संस्थेचे अध्यक्ष व डायरेक्टर प्रा. डॉ. विजय शास्त्री यांनी सोप्या आणि सरळ भाषेत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्यासाठी हा मार्ग जोपासला आहे. त्याचबरोबर रोज प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन होण्यास मदत होत आहे. प्रा. गोपीचंद भोई, प्रा. जावेद शेख व सर्व प्राध्यापक वर्गांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्याबद्दल संस्थेचे सचिव रूपा शास्त्री यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांमध्ये कोरोना बद्दल जनजागृती सुद्धा शास्त्री फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक करीत आहेत.

Protected Content