अर्णब गोस्वामीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; तीन आठवडे अटकेपासून संरक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात दाखल केलेल्या याचिकांवर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोटाने पुढचे तीन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे.

 

पालघर मॉब लिचिंग प्रकरणात २१ एप्रिलला अर्णब गोस्वामीने आपल्या रिपब्लिक टीव्हीवर केल्लेल्या डिबेट शोमध्ये सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अपमानजनक वक्तव्य केल्याचा आणि दोन धर्मांमधला तणाव वाढेल असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याच आरोपातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा, दिल्लीसह देशभरात जवळपास 13 एफआयआर दाखल केल्या आहेत. या एफआयआर रद्द करण्यात याव्यात यासाठी अर्णब गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी झाली. मुंबई-नागपूर इथल्या एफआयआर एकत्र करण्यात याव्यात, देशभरात ज्या एफआयआर दाखल झाल्या आहेत, त्यात मुंबई-नागपूर वगळता कुठल्या एफआयआरवर कारवाई होऊ नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. अर्णब गोस्वामीच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने कपिल सिब्बल, छत्तीसगडच्या वतीने विवेक तनखा, राजस्थानच्या वतीने मनीष सिंघवी यांनी युक्तीवाद केला.

Protected Content