शासनाने अन्नधान्य व आर्थिक सहाय्य करावे ; आरपीआय आठवले गटाची मागणी

कासोदा ता. प्रतिनिधी । राज्यात व संपूर्ण देशात कोरोना वायरस विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. याकाळात कोणताही रोजगार नसल्याने अशा नागरिकांना शासनाकडून अन्नधान्य व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी एरंडोल तालुका आरपीआय आठवले गट तर्फे तहसीलदारांना निवेदन करण्यात आली आहे.

लॉक डाऊन जाहीर झाल्याने सध्या स्थिती काम धंदा न करता घराबाहेर न पडता नागरिक घरात बसून आहोत . यामध्ये शेतकरी-शेतमजूर व आर्थिक दुर्बल घटकातील सर्व जाती-धर्माचे नागरिक जनता, अपंग बांधव, सुशिक्षित बेरोजगार कामधंदा न करता घरात बसून आहेत. अशा नागरिकांना शासनाकडून अन्नधान्य व आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. याविषयी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ बाविस्कर तालुका सचिव देवानंद बेहरे तालुका उपाध्यक्ष सिताराम मराठी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तहसीलदार यांच्या द्वारे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, पुरवठा राज्यमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना पाठवण्यात आले आहे.

Protected Content