शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज । शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर पार्किंगला लावलेली शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात शुक्रवार ५ मे रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुधाकर सोपान आवटे (वय-५२, रा, वडाळी ता. जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान १ मे रोजी दुपारी बारा वाजता त्यांचे नातेवाईकातील एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सुधाकर आवटे हे दुचाकी (एमएच १९  सीके १२७५) ने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या गेट समोर असलेल्या गल्लीत दुचाकी पार्क करून लावली होती. त्यानंतर त्यांचे काम आटवून पुन्हा ते घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना जागेवर दुचाकी मिळाली नाही. त्यांनी दुचाकीचा जळगाव शहरात इतर ठिकाणी शोध घेतला, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवार ५ मे रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content