शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पथनाट्याद्वारे स्तन कर्करोग जनजागृती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्तन कर्करोग व जनजागृती अभियानाचा भाग म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये जनजागृती केली. यावेळी मंचावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, वैद्यकीय महाविद्यालयचे उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जनऔषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर उपस्थित होते.

 

प्रसंगी स्तन कर्करोग होऊ नये याकरिता कोणती काळजी घेतली पाहिजे, महिलांनी स्वतःची तपासणी कशी करावी, महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष कसे होते, याबाबत विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. सूत्रसंचालन विश्वजित चौधरीयांनी तर आभार डॉ. संगीता गावित यांनी मानले. प्रसंगी शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, वैद्यकीय महाविद्यालयाचे विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी महिला, नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती.

Protected Content