जळगाव, प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक विभागाकडून शिल्ड ३.० या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. शिल्ड ३.० या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे तिसरे वर्ष होते. त्यात प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, इनोव्हेटीव आयडिया, कोड वॉर, क्विक बझ, ट्रेझर हंट, पबजी, चेस आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राध्यापक एम. व्ही. इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेला आमदार मंगेश चव्हाण यांनीही भेट दिली. स्पर्धेत विविध महाविद्यालयातून ५०० पेक्षा जास्त विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेते :प्रोजेक्ट कॉम्पिटिशन :वैष्णवी सरोदे व संघ, किरण कदम व संघ, शुभम पाटील व संघ, घनश्याम भानाइत व संघ. इनोव्हेटीव्ह आयडिया :विना माळी व संघ, ईश्वर निंभोरे व संघ. कोड वॉर् : सिद्धार्थ देवता, दत्ता गोरे. क्विक बझ : सचिन सालोखे, उमेश बोरसे. ट्रेझर हंट: धीरज पाटील व संघ, कैलास ननवरे व संघ. पबजी :जय देहादे व संघ, योगेश पाटील व संघ. चेस :वैभव काळे प्रथम तर अनिकेत ब्राम्हणकर द्वितीय आला. यास्पर्धेसाठी डॉ. पी. पी. चौधरी व कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. व्ही. इंगळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अश्विनी लोखंडे यांनी प्रस्तावना व अमोल चौधरी यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आशा चौधरी, नितीन पवार, नयना बोरसे व स्वप्नील सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले. विद्यार्थी मुख्य समन्व्यक म्हणून हिमांशू चौधरी, रोहित कुलकर्णी व खुशबू पाटील यांनी काम केले. स्पर्धेला डॉ. पाध्ये, डॉ. व्हेस्ली, डॉ स. एन. पाटील, के. पी. अकोले, एस. टी बारी, सी. पी. भोळे, के. पी वानखेडे इत्यादी उपस्थित होते.