जळगाव, प्रतिनिधी । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथील आय.सी.सी. (अंतर्गत तक्रार समिती) तर्फे ‘जेंडर सेंसीटायझेशन इन इंडिया’ या विषयावर वेबीनार गुगल तथा फेसबुकवर (लाईव्ह) आय.सी.सी. च्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी सुनिल फालक यांनी आयोजित केला होता.
या वेबीनारमध्ये विलेपार्ले, मुंबई लॉ कॉलेजच्या ॲड. डॉ.शर्मिला घुगे, जितेंद्र चव्हाण , यांनी केलेल्या मार्गदर्शन केले. यात त्यांनी शासकीय कार्यालयातील पुरुष व महिला कर्मचा-यांना त्यांचे कायदेशीर हक्क, कमिटीबाबत महिती आणि कार्यपद्धती, पुरुष व महिला यांच्या मानसिक, लैंगिक व ईतर अडचणींबद्दल आय.सी.सी. समितीकडे तक्रार करू शकतात, तसेच शासकीय महिला कर्मचारी यांच्या उन्नतीबद्दलही मार्गदर्शन केले. सदर बेबीनारमध्ये महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश , पॉडेचरी, आसाम, मध्यप्रदेश, तामीळनाडू, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक तसेच अमेरिकेतूनही काही विद्यार्थी, प्राध्यापक यांनी सहभाग घेतलेला होता. सदर वेबीनार आयोजित करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगावचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. डी. कोकाटे, प्रा. डॉ. एम. जे. साबळे , महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनात तर डॉ. व्ही. आर. सराफ, डॉ.विजेता सिंग, व्ही. पी. जाधव, विनीत काकडे, शशांक झोपे यांचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे अध्यक्ष आय.सी.सी.डॉ. मृणालिनी सुनिल फालक यांनी आभार मानले.