शाळेचा पहिला दिवस : विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद (व्हिडिओ)

वरणगाव दत्तात्रय गुरव |  राज्य शासनाने आजपासून शहरी भागात शाळा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्दशानंतर ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक्ष शाळेत जावून शिक्षण घेता येणार असल्याचा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

 

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात शाळा बंद होती. विद्यार्थ्यांना ऑनलाईनच अभ्यास करावा लागत होते. ग्रामीण भागात काही महिन्यापूर्वी आठवी ते बारावीचे शाळा सुरू करण्याचे आदेश सरकारने घेतला होता. मात्र शहरी भागांमध्ये कुठलीही शाळा सुरू न करण्याचा आदेश असल्याने शहरातील शाळा शुकशुकाट पडलेले होते. विद्यार्थ्यांचा किलबिल आवाज ऐकू येत नव्हता, आता मात्र राज्य सरकारांनी ४ ऑक्टोंबरपासून शहरी भागामध्ये आठवीत बारावीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिल्याने आज पासून शहरी भागात आठवीत बारावीचे वर्ग सुरू करण्यात आलेत.  भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय याने आजपासून आठवी ते बारावी चे वर्ग सुरू केले आहेत वर्ग सुरू करताना शालेय व्यवस्थापनाने शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनाचे संपूर्ण नियम पाळून शाळा सुरु केली आहे.  विद्यार्थ्यांचे स्कॅनिंग केले जात होती व सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जात होते. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर व चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/572006280789087

 

Protected Content