जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू असलेल्या १९ वर्षाखालील शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा घेतण्यात आले.
या स्पर्धेत मु.जे.महाविद्यालयाचा मुलींचा संघ तर गोदावरील मुलांचा संघ विजयी झाली आहे. मान्यवरांच्याहस्ते विजेते व उपविजेते संघांना ट्रॉफी देवून गौरव करण्यात आला आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम चे अध्यक्षे जाकीर शिकलगावर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, खेळाडूंमध्ये असलेली चिकाटी वृत्ती व आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती यामुळे तो व्यवसायात नक्कीच यशस्वी होतो म्हणून विद्यार्थ्यांनी प्रथम ना नफा ना तोटा इथून व्यवसायाची सुरुवात केल्यास तो निश्चितच यशस्वी होईल यात शंका नाही असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर त्यांचे सहकारी अब्दुल मजीद, (कतर) अहसान सय्यद (वरणगाव) जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष जफर शेख (पिंच बोटेलिंग एम डी) सचिव फारूक शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक मनोज सुरवाडे व ताहेर शेख आदी उपस्थित होते.