शार्टसर्कीटमुळे मकासह चारा व ठिंबळ नळ्या जळून खाक; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा शिवारातील शेतात झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे शेतातील मका, मकाचा चारी, पीव्हीसी पाईप आणि ठिंबक नळ्या जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी १२ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील रहिवाशी शालीग्राम भाऊलाल पाटील (वय-७१) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे नांद्रा शिवारात ८ बिगे शेती आहे. यापैकी ५ बिगे शेतात त्यांनी मका लावलेला होता. काहि दिवसांपुर्वीच त्यांनी मका कापून ठेवलेला होता. शुक्रवारी १२ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांच्या शार्टसर्कीटमुळे शालीगाम पाटील यांच्या शेताताील मकाला आग लागली. या आगीत शेतातील मका, मकाचा चारा, बांधावर ठेवलेलेल्या ठिंबक नळ्या संपुर्ण जळून खाक झाले आहे. तसेच शेजारील शेतकरी किरण पंजाबराव पाटील यांच्या शेतातील ठिंबक नळ्या आणि बंटी रमेश पाटील यांच्याशेतात मकाचा चारा जळून खाक झाला आहे. या आगीत अंदाजे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान, शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Protected Content