यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी व २६ / ११ च्या दिवशी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल्स रेल्वे स्थानकावर आरपीएफ या विभागात नौकरीस असतांना दहशतवाद्यांचा केलेल्या भयाड हल्लात अनेक निरपराधांना आपले प्राण द्यावे लागले होते. याच हल्ल्यात शहीद मुरलीधर चौधरी हे अतिरिक्यांशी लढा देतांना या हल्ल्यात वीरमरण प्राप्त झाले होते.
या शहीद जवान मुरलीधर चौधरी यांच्या आठवणी निमित्त हिंगोणा येथील शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी त्यांच्या मूळ गावी ग्रामपंचायत परिसरात शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. या अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यास आज १४ वर्षे पूर्ण होत आहे परंतु आज देखील शहिदांचे बलिदान व स्मारक हे मनापासून आठवण करून देत आहे.
हिंगोणा येथे शहीद स्मारक व्हावे अशी ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती त्यावेळेस तत्कालीन आमदार स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांच्या स्थानिक विकास निधीतून शहीद स्मारक उभारण्यात आले आहे हे शहीद स्मारक हिंगोणा येथील तरुण युवक युवतींना प्रेरणा देणारे ठरत आहे.