जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका भागातील १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे, याप्रकरणी शनिवार, २५ मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील शहर पोलीस ठाणे हद्दीत एका भागात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियासह वास्तव्यास आहे. २४ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. दिवसभरात तसेच रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिला कुणीतरी पळवून नेल्याची खात्री झाल्यावर दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री मुलीच्या वडीलांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास चऱ्हाटे हे करीत आहेत.