जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील काव्यरत्नावली चौकात जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने पोलीस स्थापना दिनानिमित्त बुधवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शस्त्र, श्वान पथक, वायरलेस, पोलीस बॅण्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथक प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्याहस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक (गृह) संदीप गावित, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया आदी मान्यवर उपस्थित होते. विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. यासह एनसीसी व एनएसएसचे कॅडेट सुद्धा उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
आयोजित प्रदर्शनात एके 47, एसएलआर रायफल, कारबाईन 9एमएम, अश्रुधूर साठा, पम्प अॅक्शन, 9एमएम पिस्टल, ग्लॉक पिस्टल, रिव्हॉलर, श्वान पथकातील डाॅबरमॅन व लॅबेडर प्रजातीचे श्वान, वायरलेस प्रणाली, दंगानियंत्रण पथकातील कमांडो, इन्सास रायफल आदी पोलीस हाताळत असलेले शस्त्र व यंत्रणेचे प्रदर्शनात समावेश होते.
अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचा इतिहास मांडला तर आभार प्रदर्शन संदीप गावित यांनी केले. युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. पोलीस विभाग व नागरिकांमध्ये सम्न्वय व संवाद वाढावा तसेच विद्यार्थ्यांना पोलीस विभागातातील संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आयोजन केल्याचे कावडीयांनी सांगितले. सूत्रसंचालन अमीत माळी यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला जळगाव शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, रामकृष्ण कुंभार, विजयकुमार ठाकूरवाड, किशोर पवार, दिलीप भागवत, शिल्पा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आरपीआय संतोष सोनवणे, आरएसआय मंगल पवार, ड्रील इन्स्ट्रक्टर देविदास वाघ, डी.वाय. मराठे, दिपक पाटील, हरीष कोळी, राजेंद्र वाघ, किरण सपकाळे, पीएसआय अमोल कवडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, सयाजी जाधव, भटु अग्रवाल, उमाकांत जाधव, निरंजन पाटील, संदीप सुर्यवंशी, सौरभ कुलकर्णी, दिनेश पाटील, राहुल चव्हाण, शिवम महाजन, अमित जगताप आदींनी परिश्रम घेतले.