जळगाव प्रतिनिधी । रमजान या पवित्र महिन्यातील विसावा दिवस ‘शब-ए-कद्र’ म्हणून मानला जातो. या दिवशी मुस्लिम समाज बांधवांनी आपापल्या घरी प्रार्थना करावी, कोरोना आजार संपूर्ण विश्वातून नष्ट करावा यासाठी अल्लाकडे साकडे घालावे, असे आवाहन एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विनायक लोकरे यांनी यांनी केले.
रमजान या पवित्र महिन्यातील विसावा दिवस ‘शब-ए-कद्र’ म्हणून मानला जातो. या दिवशी पवित्र कुराणाचे अवतरण झाले आहे. म्हणून या दिवसाच्या रात्रीला शब-ए-कद्र साजरी केली जाते. या रात्री सुद्धा मुस्लिम समाज रात्रभर अल्लाची प्रार्थना करतो व अल्लाहला साकडे घालतो व निश्चितच अल्लाह त्याची प्रार्थना कबूल करतो, म्हणून मुस्लिम समाज बांधवांनी आपापल्या घरी प्रार्थना करावी, कोरोना आजार सम्पूर्ण विश्वतून नष्ट करावा, यासाठी अल्लाकडे साकडे घालावे असे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विनायक लोकरे यांनी यांनी केले आहे.
बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे मुस्लिम कब्रस्तान व ईदगाहच्या विश्वस्तांना बोलवून त्यांच्याशी लोकरे बोलत होते. ट्रस्टतर्फे फारुक शेख, सह सचिव अनीस शाह व जामा मस्जिद ट्रस्टचे तय्यब शेख उपस्थित होते. दरम्यान शब-ए-कद्रला कोणत्याही मुस्लिम बांधवांनी मुस्लिम कब्रस्तान, ईदगाह मशीद व इतर मशिदीत नमाज अदा करण्यासाठी येऊ नये, असे आवाहन ईदगाह ट्रस्ट आणि पोलिसांतर्फे करण्यात आलेले आहे.