जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ पोलीस हद्दीतील विठ्ठल पेठ परिसरातून एका रिक्षाचालकाची रिक्षा चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र दगडू बारी (वय-५०) रा. विठ्ठल पेठ जळगाव हे ऑटोरिक्षा क्रमांक (एमएच १९ सी डब्ल्यू ३२१४) प्रवाशी वाहतूक चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास रिक्षा ही कोल्हे यांच्या दवाखान्यातील रोडवर सार्वजनिक ठिकाणी लावून घरी गेले असता रात्री ११ वाजता सार्वजनिक शौचालय येथे लावलेली रिक्षा दिसून आली. दरम्यान सर्वजन झोपून गेले. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता रिक्षा जागेवर दिसून आली नाही. रिक्षा चालक राजेंद्र बारी यांचा मुलगा गौरव बारी याला रिक्षा दिसून आली नाही. त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यांना रिक्षा मिळून न आल्याने १ लाख ६० हजार रूपये किंमतीची रिक्षा चोरून गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शनीपेठ पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनीपेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.