शनिवारी डोणगाव येथे हभप रविकिरण महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील डोणगाव  येथे  योगेश सुरेश पाटील या सैनिकाच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर रॉयल फौजी योगेशभाऊ मित्र परिवातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. यात आरोग्य शिबीर संपन्न झाले असून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

सैनिक योगेश सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त रॉयल फौजी योगेशभाऊ मित्र परिवार डोणगाव तसेच ग्रामस्थ व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (गोदावरी फाउंडेशन) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा बहुसंख्य नागरीकांनी लाभ घेतला तर याच पार्श्वभुमीवर सामाजिक कार्येकर्ते व रॉयल फौजी योगेशभाऊ मित्रपरीवार व डोणगाव ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातुन शनिवार दि. २६ नॉव्हेबर रोजी रात्री ८:३० वाजता ह.भ.प.रविकिरण महाराज  दोंडाईचाकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्हा परिषद मराठी शाळेत होणाऱ्या या भक्तीमय किर्तनाच्या कार्यक्रमाचा डोणगाव परीसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रॉयल  फौजी योगेशभाऊ मित्र परीवार व डोणगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Protected Content