फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘व्हाईस ऑफ मिडिया’ कडून प्रांताधिकारी कैलास कडलग यांना पत्रकारांच्या विविध हक्कांच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी निवेदन देण्यात आले.
सदरची निवेदन जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका अध्यक्ष ललित फिरके यांनी दिले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, यावल तालुका उपाध्यक्ष समीर तडवी, उपाध्यक्ष नितीन झांबरे, सदस्य याकुब पिंजारी, संतोष वराडे उपस्थित होते.
यात पूढील प्रमाणे मागण्या – पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.
वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा. पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात.साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. फक्त करांच्या मागण्यांचे दाखल घेऊन न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे.