राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले : उध्दव ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सुप्रीम कोर्टाच्या निकालातून राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाल्याची घणाघाती टिका माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. ते आज मातोश्री वरील पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, देशात आता लोकशाहीची हत्या सुरू आहे. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालातून हेच अधोरेखीत झाले आहे. न्यायालयाने माझ्या राजीनाम्याबाबत असेच भाष्य केले आहे. मात्र मला मुख्यमंत्रीपदात नव्हे तर जनतेच्या कामांमध्ये रस असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.

 

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेबाबत केलेल्या टिपण्णीवर देखील उध्दव ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, कोर्टाने राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण केले. यामुळे आता भविष्यात राज्यपाल नावाची संस्था रहावी की नाही ? याबाबत विचार करण्याची वेळ आलेली आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय हे चुकीचे होते याकडे देखील त्यांनी लक्ष वेधून घेतले.

Protected Content